खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजितं वधू-वर मेळावा २०२३च्या निमित्ताने

खान्देश माळी मंडळ
पिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजितं
वधू-वर मेळावा २०२३च्या निमित्ताने

नानाभाऊ माळी

खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजितं वधू-वर मेळावा २०२३च्या निमित्ताने 

नानाभाऊ माळी

नमस्कार!बंधू-भगिनींनो!अनुभव आदर्श मार्गावरील गुरु असतो!अनुभवातून आपण शिकत असतो!डोळस होत असतो!अनुभवांची शिदोरी पुढील वाटचालीसाठी साथ-संगत असतें!

खान्देश माळी मंडळाची स्थापना मागील २५वर्षांपूर्वी झाली होती!समाज हितासाठी झटणाऱ्या तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे चांगले वाईट अनुभव सोबत घेऊन मंडळ एक एक पाऊले पुढे टाकीत राहिले!

मागील कार्यक्रमातील त्रुटी पुढील कार्यक्रमात कमी करत करत समृद्ध अनुभव पाठीशी घेत मंडळाची अथक वाटचाल सुरूच आहे!

खान्देश माळी मंडळाची काही उद्दिष्ट होती!ती प्राप्त करण्यासाठी त्या दिशेने वाटचाल सुरूच आहे!खान्देशातून  पुण्यात आलेल्या माळी बांधवानां एकत्र आणणे!कौटुंबिक जिव्हाळा ठेवणे!प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे!संत सावता महाराज यांच्या कर्म सिद्धांताच्या वाटेवर चालत रहाणे!

महामानव महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचां आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे!सर्व समाज बांधवांनां एकत्र येण्यासाठी राज्यव्यापी कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करणे!आपल्याच गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करणे,समाजातील उपवर मुलं-मुलींसाठी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करणे!असें अनेक उ्दिष्टे मंडळ स्थापनेच्या वेळेस डोळ्यासमोर होती!

प्रत्येक वर्षी कार्यक्रम होत गेले!समाज बांधव एका धाग्याने गुंफलीं जाऊ लागली!आपण जन्मभूमीतून लांबून आलो!येथे या कर्मभूमीत एकरूप होत गेलो!वर्षातून कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्ताने कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होत गेला!एकमेकांच्यात जिव्हाळा निर्माण होत गेला!आपण ४००-५०० किलोमीटर दूर आहोत, पुण्यात आहोत!ही तुटक भावना हळूहळू सांधली जाऊ लागली!

खान्देश माळी मंडळाचें पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या कार्यात एकदिलाने झोकून देत असतात!म्हणूनच “एकता यशोबिजम”ही भावना वाढीस लागत आहे!जुने नवे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने मंडळ या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करीत आहे!एक मेकांविषयी आदर,आपुलकी ठेवून खान्देश माळी मंडळातील सर्व बांधव-भगिनी विकास प्रक्रियेतील कृतिशील घटक झालेले आहेत!स्थानिक समाज समुदायाशी, बांधवांशी एकोपा राखून आपला विकास साधित आहेत!


पूर्वी पुण्यामध्ये जी मंडळी आली होती त्यांचां पुण्यात राहायचाचं मोठा प्रश्न निर्माण झाला होता!ओळख नसल्याने कुठे राहणार? हा प्रश्न मंडळ पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला!जुन्यांना जो त्रास झाला तो पुण्यात येणाऱ्या नवीन पिढीला होऊ नये म्हणून खान्देश माळी मंडळाने आळंदी जवळ ११गुंठे जागा विकत घेतली आहे!तेथे वस्तीगृह उभारून गावाकडून येणाऱ्या तरुण समाज बांधवांची राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था होईल!असें अनेक भावी स्वप्न पाहात कृतिशील होत मंडळाचे कार्यकर्ते राबत आहेत!मेहनत घेत आहेत!

रविवारी दिनांक १७डिसेंबर २०२३ रोजी पिंपरीतील ycm हॉस्पिटल शेजारी आचार्य अत्रे सभागृहात अखिल माळी समाजाचा भव्य
राज्यव्यापी वधू-वर मेळावा आयोजित केला आहे!वधू-वर समितीचीं टिम त्यासाठी मेहनत घेत आहे!ऑनलाईन नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे!सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते वधू-वर मेळावा यशस्वी होण्यासाठी धावपळ करीत आहेत!मेहनत घेत आहेत!कष्टालां चांगलं फळं मिळत असतं!कार्यकर्ते दर वर्षी कष्ट घेतात!वधू-वर मेळाव्याचा लाभ राज्य आणि राज्या बाहेरील माळी समाज बांधवाना होत आहे!गेल्या २४वर्षापासून जवळपास ६००० उपवर मुला -मुलींनी वधू-वर मेळाव्याचा लाभ घेतला आहे!

माळी समाज बांधवांनी पुण्यातील पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात येऊन विवाह स्वप्न साकार करावे!आयुष्याचा जोडीदार निवडावा!पसंतीनुरूप विवाह योग जुळून येतीलचं!

खान्देश माळी मंडळ भावी वधू-वरांना एकत्र आणण्याचं पुण्य घेत आहे!माध्यम म्हणून खान्देश माळी मंडळ कार्यरत आहे!वधू-वर मेळाव्या निमित्ताने हृदयातले काहो बोलं प्रस्तुत केलेत!

         धन्यवाद
खान्देश माळी मंडळ,
पिंपरी-चिंचवड,पुणे परीसरच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले

अध्यक्ष…
नानाभाऊ माळी
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
  हडपसर,पुणे-४११०२८
दिनांक-०३ डिसेंबर २०२३

2 thoughts on “खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड,पुणे परीसर आयोजितं वधू-वर मेळावा २०२३च्या निमित्ताने”

Leave a Comment